कोकणात अवकाळीचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवस कसं असणार हवामान?
VIDEO | कोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा, हवामान खात्यानं काय वर्तविला अंदाज
रत्नागिरी : कोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून कोकण किनारपट्टीवर देखील ढगाळ हवामान आहे. सध्या दुपारपर्यंत आकाशात काळे ढग दाटून आलेले पाहायला मिळत आहे. सध्या हवामान मळभ असल्याने हवेतील आद्रता देखील वाढली आहे. हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असताना शेतकरी चिंतेत आले आहे. विशेषतः अंबा बागायतदार मात्र हवालदिल झाले आहेत. शेवटच्या टप्प्यातील होणारं आंब्याचं उत्पादन तरी मिळावं यासाठी आंबा बागायतदारांची धडपड पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोमवार आणि मंगळवारी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातही ढगाळ हवामान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.