माजी गेले,आजी आले, मंत्रालय सजलं! नवे मुख्यमंत्री आज पदभार स्वीकारणार…
मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी हुतात्मा स्मारक, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. तसंच ठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीचंही दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतलं.
मुंबई : गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात एकामागे एक राजकीय भूकंप सुरु होते. आधी माजी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हवर येत राजीनामा दिला. त्या नंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होतील असं म्हणता म्हणता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार अशी घोषणा करण्यात आली. शपथविधी पार पडला आणि अखेर एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री (New CM) झाले.मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठरावही जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी हुतात्मा स्मारक, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. तसंच ठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीचंही दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतलं.मंगळवारी दुपारी शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरात आरती केली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार (Chief Minister Eknath Shinde) स्वीकारणार आहेत. यानिमित्तानं मंत्रालयातलं सीएम कार्यालय सजविण्यात आलंय.