नागपुरकरांची लाईफलाईन असलेली 'आपली बस' महापालिका प्रशासनासाठी डोईजड?

नागपुरकरांची लाईफलाईन असलेली ‘आपली बस’ महापालिका प्रशासनासाठी डोईजड?

| Updated on: Aug 08, 2023 | 2:42 PM

VIDEO | नागपुरकरांची लाईफलाईन असलेली 'आपली बस' तोट्यात, नागपूर महानगरपालिका प्रशासन काय उचलणार पाऊल?

नागपूर, 8 ऑगस्ट 2023 | नागपूर महानगरपालिका आपली बसच्या माध्यमातून शहरात संचलित करीत असलेली परिवहन व्यवस्था महापालिकेसाठी डोईजड ठरत आहे. कारण नागपूर महानगरपालिका आपली बससेवा आता तोट्यात असल्याचे दिसत आहे. आपली बसमध्ये दररोज लाखावर प्रवासी प्रवास करीत असले तरी त्यातून मिळणारे उत्पन्न वर्षाला 82 कोटीच्या जवळ आहे. मात्र या बदल्यात परिवहन विभाग ज्या ऑपरेटरच्या माध्यमातून ही बस चालवते त्याला वर्षाचे 150 कोटी द्यावे लागते. त्यामुळे महापालिकेला ही बस सेवा तोट्यात चालवावी लागत आहे. एकंदर गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता शहरात इलेक्ट्रिक बस आल्या. मात्र त्याचाही फार परिणाम झाला नसल्याचं चित्र पाहायला मिळते. आपली बस सेवा हे तोट्यात असल्याचं माहिती अधिकारातून समोर आले आहे.

Published on: Aug 08, 2023 02:38 PM