Chandrakant Patil Live | दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावंही उघड होणार- चंद्रकांत पाटील

| Updated on: Sep 20, 2021 | 1:31 PM

पाटील यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण ते कोण नेते आहेत ते काही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अधिकच सस्पेन्स वाढला आहे. ज्या काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत ते राज्यमंत्री आहेत की कॅबिनेट मंत्री? ते आमदार आहेत की नेते आहेत? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.