निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाच्या राष्ट्रीय दर्ज्याबाबत मोठा निर्णय
VIDEO | देशाच्या राजकारणात मोठा भूकंप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह या तीन पक्षांना धक्का; निवडणूक आयोगाने काय घेतला निर्णय
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 साली झाली असून तेव्हापासून सलग 15 वर्ष हा पक्ष राज्यात सत्तेत होता. सत्ते आल्यापासून या पक्षाने देशाच्या राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांची राष्ट्रीय मान्यता रद्द केली आहे.
Published on: Apr 10, 2023 08:25 PM
Latest Videos