दुपारी कडाक्याचं ऊन अन् संध्याकाळी अवकाळी पाऊस, ऊन-पावसाच्या खेळानं नागरिक हैराण
VIDEO | कडाक्याच्या उन्हात घामाच्या धारा अन् अवकाळी पावसासह गारा, कुठं झाले नागरिक बेहाल?
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारांनी बळीराजा संकटात सापडला आहे. तर वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही घरांचे पत्रे, छप्परं उडून देखील मोठं घरांचं नुकसान झाल्याचे पाहायल मिळत आहे. अशातच काल नागपूर येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सुद्धा नागपूर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने सुद्धा तीन दिवसापर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आजही पाऊस येणार का याकडे लक्ष लागले आहे. महत्त्वाचं म्हणजे भर उन्हाळ्यात नागपूरकर पावसाचं वातावरण अनुभवत आहे. या अवकाळी पावसामुळे नागपूरकर हैराण झाले असून दुपारी उकाड्याने त्रस्त तर पाऊस आल्यानंतर पावसाने त्रस्त अशा प्रकारचा अनुभव सध्या नागपूरकर घेत आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आजही पाऊस येणार का याकडे याने शेतकरी चिंतातूर आहे.