राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या याचिकेवर ‘या’ तारखेला होणार सुनावणी, आयोगानं मागितलं उत्तर
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोघांच्या गटाला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये पक्षाचं चिन्ह आणि पक्षावर दावा सांगण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यक माहितीची मागणी केली होती. याकरता दोन्ही गटांना […]
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोघांच्या गटाला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये पक्षाचं चिन्ह आणि पक्षावर दावा सांगण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यक माहितीची मागणी केली होती. याकरता दोन्ही गटांना तीन आठवड्यांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. ही मुदत गुरूवारी संपली. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार यांचा गट निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नाही. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता. मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या याचिकेवर सप्टेंबरमध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी ८ सप्टेंबरपर्यंत लेखी उत्तर द्यावं, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तर अजित पवार आणि शरद पवार गटानं एकमेकांना उत्तर द्यावं असेही आयोगानं म्हटले आहे.