अहमदनगरच्या श्रीगोंद्याची हंगेवाडी गावची यात्रा उत्साहात संपन्न, बघा दृश्य
VIDEO | अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न, या गावात स्वयंभू पंचालींग पुरातन शंकराचे मंदिर
अहमदनगर : कोरोनानंतर राज्यातील विविध गावच्या यात्रा या मोठ्या उत्साहात साजऱ्या होत आहेत. अशाच पध्दतीने अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडीच्या यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. यात्रेनिमित्त विविध प्रथा परंपरा या आजही जपल्या जातात. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. हंगेवाडी या गावात स्वयंभू पंचालींग पुरातन शंकराचे मंदिर आहे. या यात्रेच्या दिवशी शंकर-पार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो. राज्यात दोनच ठिकाणी शंकर पार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो, पहिला म्हणजे शिखर शिंगणापूर तर दुसरा हंगेवाडी या गावात. हंगेवाडीत दरवर्षीप्रमाणे यंदाही शंकर- पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी नवरी चिंबळा गावची तर नवरदेव शिरजगाव पाटा येथील असतो,तर कलवरी काष्टी गावची असते. या लग्नाचं देवाक गुन्हाट येथील असते. नवरी आणि नवरदेव म्हणून एक विशिष्ट काठी तयार केली जाते, लग्नाआधी ही काठी देवाच्या कळसाला लावली जाते त्यानंतर भाविकांच्या मांदियाळीत हा विवाह पार पडतो.