पाईपलाईन फुटली अन् पाण्याचे आकाशात उडाले उंचच्या उंच तुषार, बघा व्हिडीओ
VIDEO | शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, पाईप लाईन फुटल्याने काही काळ मुख्य वाहतूक झाली होती ठप्प
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे पाहायला मिळाले. अचनाक छत्रपती संभाजीनगरमध्ये पाईपलाईन फुटल्याने पाईप लाईन मधल्या पाण्याचे आकाशात उंच तुषार उडाले. ही पाईपलाईन फुटल्यानं ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली तेथून प्रवास करणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय झाली. तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने तत्परता दाखवत त्वरीत पाणी गळती थांबवली. दरम्यान, पाईप लाईन फुटल्याने काही काळ पैठण रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या वाहनांना याचा मोठा फटका बसला. ही पाईपलाईन फुटल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा परिसरात घडली होती.
Published on: Apr 07, 2023 08:57 AM
Latest Videos