पोलिसांनी काँग्रेस अतुल लोंढे खरोखरच प्रत्यक्ष मुसक्या आवळल्या
लोंढेंचे दोन्ही हात पाठी पकडून पोलिसांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला होता. त्या अवस्थेतही लोंढे घोषणा देत होते. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनकडे नेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे (congress) कोरोना पसरल्याचं विधान संसदेत केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी काँग्रेस जोरदार निदर्शने करणार आहे. पण त्यापूर्वीच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (atul londhe) यांनी एकट्यानेच सागर निवासस्थानी गेले आणि त्यांनी सागर बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तेव्हा महाराष्ट्र द्रोही बीजेपीचा निषेध असो, अशा घोषणा लोंढे यांनी दिल्या. त्यावेळी अरे या, गाडी घे ना असं म्हणत पोलिसांनी लोंढेंच्या खरोखरच मुसक्या आवळल्या. लोंढेंचे दोन्ही हात पाठी पकडून पोलिसांनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला होता. त्या अवस्थेतही लोंढे घोषणा देत होते. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनकडे नेले.