Special Report | उपमुख्यमंत्रीपद आणि महाराष्ट्रातील रंजक गोष्टी, जाणून घ्या पदाची सुरुवात का आणि कशी झाली?

Special Report | उपमुख्यमंत्रीपद आणि महाराष्ट्रातील रंजक गोष्टी, जाणून घ्या पदाची सुरुवात का आणि कशी झाली?

| Updated on: Jul 02, 2022 | 11:18 PM

भाजपातील केंद्रीय स्तरावरील नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अगदी चांगले असल्याचं बोललं जातं. पण, त्यांना अचानक उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश देण्यात आले. हा निर्णय फडणवीस यांना अपमानित करण्यासाठी घेतल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून समोर येत आहेत. दरम्यान, हे सगळं सुरू असताना उपमुख्यमंत्रीपदाविषयी चर्चा सुरू झाली. उपमुख्यमंत्रीपद कधी सुरू झालं, याविषयीच्या महाराष्ट्रातील रंजक गोष्टी पाहुया या स्पेशल रिपोर्टमधून...

मुंबई : (Maharashtra Politics) राज्यातील 10 दिवसाच्या राजकीय नाट्यावर पडदा पडत असताना जो शेवट झाला त्यानं सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर काहींनी हा (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे म्हटलं तर काहींनी केंद्रीय नेत्यांचे तसे आदेशच असल्याचे तर्क लावले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना अपमानित करण्यासाठीच त्यांना मुख्यमंत्रीपद न देता उपमुख्यमंत्रीपद (Deputy Chief Minister) दिल्याचे मत (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं होतं. भाजपातील केंद्रीय स्तरावरील नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अगदी चांगले असल्याचं बोललं जातं. पण हा निर्णय फडणवीस यांना अपमानित करण्यासाठी घेतल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून समोर येत आहेत. दरम्यान, हे सगळं सुरू असताना उपमुख्यमंत्रीपदाविषयी चर्चा सुरू झाली. उपमुख्यमंत्रीपद कधी सुरू झालं, याविषयीच्या महाराष्ट्रातील रंजक गोष्टी पाहुया या स्पेशल रिपोर्टमधून…

 

Published on: Jul 02, 2022 11:17 PM