Good News : आता अमेरिकेतच H1B व्हिसा रिन्यू होणार, PM मोदी यांनी केली घोषणा
या दौऱ्याच्या आधी अमेरिकेकडून महत्वाची घोषणा करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितलं. पीएम मोदींनी रोनाल्ड रीगन सेंटरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना ही आनंदाची बातमी दिली. त्यांनी, भारतीय व्यावसायिक परदेशात प्रवास न करता अमेरिकेतच त्यांच्या H1B व्हिसाचे नूतनीकरण करू शकतील अशी घोषणा केली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. तेथील त्यांचा दौरा संपत असून ते आता इजिप्तच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्याच्या आधी अमेरिकेकडून महत्वाची घोषणा करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितलं. पीएम मोदींनी रोनाल्ड रीगन सेंटरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना ही आनंदाची बातमी दिली. त्यांनी, भारतीय व्यावसायिक परदेशात प्रवास न करता अमेरिकेतच त्यांच्या H1B व्हिसाचे नूतनीकरण करू शकतील अशी घोषणा केली. तसेच H1B व्हिसाच्या नूतनीकरणासाठी आता व्यावसायिकांना अमेरिकेबाहेर जाण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी अमेरिकेतील आणखी दोन शहरांमध्ये दूतावास सुरू केले जाईल अशीही घोषणा मोदी यांनी केली.
Published on: Jun 24, 2023 09:08 AM
Latest Videos