नेवासा तालुक्यातील मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला

नेवासा तालुक्यातील मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला

| Updated on: Jul 15, 2022 | 12:49 PM

नेवासा तालुक्यातील मुळा धरणाचा उजवा कालवा फुटल्याची माहिती समोर येत आहे.

नेवासा तालुक्यातील मुळा धरणाचा उजवा कालवा फुटल्याची माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ही घटना आहे. देवगाव इथं हा बंधारा फुटला आहे. कालवा फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर कायम असून आणखी दोन दिवसांनी तो कमी होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरस्थिती उद्भवली असून अनेक गावं पाण्याखाली आहेत. मराठवाड्यातील पाऊस सध्या सरासरीच्या तुलनेत पुढे आहे.

Published on: Jul 15, 2022 12:49 PM