Raigad Landslide | वडवली ते दिघी रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

Raigad Landslide | वडवली ते दिघी रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

| Updated on: Jul 19, 2021 | 2:39 PM

वडवली ते दिघी रस्तावर कुडगाव हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली असून, दरड हटवण्याचे काम सुरू आहे. पर्यायी मार्गाने (नानवली मार्गे) वाहतूक सुरू आहे. माणगाव- म्हसळा मार्गावर मोरबाच्या पुढे माणगाव तालुका हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली आहे.

वडवली ते दिघी रस्तावर कुडगाव हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली असून, दरड हटवण्याचे काम सुरू आहे. पर्यायी मार्गाने (नानवली मार्गे) वाहतूक सुरू आहे. माणगाव- म्हसळा मार्गावर मोरबाच्या पुढे माणगाव तालुका हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली आहे. स्थानिक लोकांनी दिघी माणगाव रोड बनवत असताना प्रांताधिकारी शेडगे साहेबांकडे तक्रार केली होती. मोठ्या प्रमाणात डोंगर खोदलेले आहेत आणि तिथल्या जुन्या मोऱ्यासुद्धा बंद करण्यात आल्या, म्हणून पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. पाण्याने आपल्यासोबत डोंगराला देखील रस्त्यावर आणले आहे. सध्या शासनातर्फे दरड हटवण्याचे काम सुरु आहे.