VIDEO : वाळू चोरी करणाऱ्या ट्रकचा थरारक पाठलाग, 12 किमी जाऊन मुसक्या आवळल्या

VIDEO : वाळू चोरी करणाऱ्या ट्रकचा थरारक पाठलाग, 12 किमी जाऊन मुसक्या आवळल्या

| Updated on: Aug 12, 2021 | 7:58 AM

विशेष म्हणजे ट्रक चालकाने दोन वेळा हा ट्रक या अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही न घाबरता ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला. शेवटी एका शेतात जाऊन हा ट्रक थांबला.

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात प्रशासनाने चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तब्बल 12 किलोमीटर पाठलाग करून ट्रक पकडला. वैजापूरचे उपविभागीय अधिकारी दीपक त्रिभुवन आणि माणिक आहेर या दोन अधिकाऱ्यांनी हा ट्रक पकडला. विशेष म्हणजे ट्रक चालकाने दोन वेळा हा ट्रक या अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही न घाबरता ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला. शेवटी एका शेतात जाऊन हा ट्रक थांबला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हा ट्रक ताब्यात घेऊन त्यावर 2 लाख 72 हजारांचा दंड ठोठावला. या ट्रकचा पाठलाग करून ट्रक ताब्यात घेण्याची थरारक दृष्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीत.