Mumbai | नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचं वेळापत्रक बदललं
यात्रेदरम्यान नारायण राणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी पार्क येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.
मुंबई : नारायण राणे यांची जन-आशिर्वाद यात्रा 19 आणि 20 ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट, सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन यात्रेला सुरुवात होईल. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. यात्रेदरम्यान नारायण राणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी पार्क येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.
Latest Videos