What India Thinks Today LIVE: नवी दिल्लीतून ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ कॉन्क्लेव्हची आजपासून दमदार सुरूवात
टीव्ही9 नेटवर्ककडून 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी व्हॉट इंडिया थिंक्स टुडे आणि सत्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरूण दास हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
नवीदिल्ली, २५ फेब्रुवारी २०२४ : TV9 नेटवर्कच्या वार्षिक जागतिक फ्लॅगशिप समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ची दुसरी आवृत्ती आज नवी दिल्लीत सुरू झाली आहे. तीन दिवसीय News9 ग्लोबल समिटमध्ये देशासह जगातील बडे नेते आणि प्रतिभावंतांकडून आपली भूमिका, संकल्पना, पर्याय आणि कृती कार्यक्रम मांडला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे संमेलन होत असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या वर्षाची थीम ‘इंडिया: पोझ्ड फॉर द नेक्स्ट बिग लीप’ अशी आहे. या तीन दिवसीय ग्लोबल समिटमध्ये अनेक राजकारणी, सेलिब्रिटी आणि मान्यवर आपली मते मांडतील. दरम्यान, आज 26 फेब्रुवारी रोजी न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये प्रमुख अतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून कोणतं भाष्य करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. टीव्ही9 नेटवर्ककडून 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी व्हॉट इंडिया थिंक्स टुडे आणि सत्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरूण दास हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.