‘त्या’ भूमिकांवर शिक्कामोर्तब; शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने आलेल्या निकालावर माधव भंडारी काय म्हणाले?
VIDEO | राज्याच्या सत्तासंघर्षावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी म्हणाले...
अहमदनगर : राज्याच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे फडणवीस सरकार हे घटनेतील सर्व तरतुदीचा पालन करून लोकशाही मार्गाने निर्माण झालेले सरकार आहे. त्यामुळे सरकारला दिलासा मिळेल याबाबत आमच्या मनात कधीही शंका नव्हती, असं माधव भंडारी यांनी म्हटलं आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने आम्ही मांडत आलेल्या भूमिकांवर शिक्कामोर्तब झालं आहे. न्यायालयाच्या निकालाच आम्ही स्वागत करतो, असं देखील भंडारी म्हणाले आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षण वेगळी आणि निकाल वेगवेगळी असू शकतात असं भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे निकालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे पाहिल्याशिवाय निकालाबाबत प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही असं भंडारी यांनी म्हटलं आहे.