Aurangabad | वेरुळ लेण्यातील सीताखोरी धबधबा वेगानं प्रवाहित
मागील काही महिने महाराष्ट्रात पावसाने तुफान धुमाकुळ घातला होता. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. सोबतच अनेक ठिकाणी धबधब्यांना देखील चांगला प्रवाह आला आहे.
मागील काही महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली होती. औरंगबाद जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे म्हैेसमार परिसरात तुफान पाऊस सुरु असल्याने वेरुळ लेण्यांमधील सीताखोरी धबधब्यालाही चांगत पाणी आलेलं आहे.
100 फुटांवरुन पाणी कोसळंतानाचा मनमोहक दृश्य वेरुळ लेण्यांमधील सीताखोरी धबधब्याजवळ दिसून येत आहे. शेकडो वर्षांपासूनचा हा धबधबा पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळे धबधब्याचं फेसाळलेलं पाणी नदीत पडतानाचं नयनरम्य दृश्य पाहताना डोळ्याचे पारडे फिटत आहे.
Latest Videos