Special Report | गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी… विरोधकांची नवीन घोषणाबाजी
विरोधकांनी अधिवेशनाच्या(monsoon session) दुसऱ्या दिवशी, जरा वेगळ्या घोषणा दिल्या. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला गेले होते, तोच धागा पकडत महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुवाहीटीवरुन घोषणा दिल्या. तर आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी दिलंय.
मुंबई : गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुवाहाटी. ईडी सरकार हाय हाय. 50 खोके, एकदम ओके. विरोधकांनी अधिवेशनाच्या(monsoon session) दुसऱ्या दिवशी, जरा वेगळ्या घोषणा दिल्या. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला गेले होते, तोच धागा पकडत महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुवाहीटीवरुन घोषणा दिल्या. तर आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी दिलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी कारवाईचाही विरोधकांनी घोषणाबाजीतून निषेध केला. आता या घोषणाबाजीतील गंमतीचा भाग म्हणजे, ऐरव्ही विरोधक इतर घोषणा द्यायचे. पण शिंदे गटाचे आमदार दिसले की 50 खोक्यांवरुन घोषणा सुरु व्हायच्या. मग मंत्री गुलाबराव पाटील असो की मंत्री दीपक केसरकर. इकडे भाजपच्या शेलारांनीही पुन्हा, विरोधकांच्या घोषणाबाजीला हातवारे करत प्रतिसाद दिला. पण पहिला दिवस आपल्या घोषणांशी गाजवणारे धनंजय मुंडे काही दुसऱ्या दिवशी नव्हते. पावसाळी अधिवेशनाचे 2 दिवस संपलेत…पण कामकाजापेक्षा विरोधकांच्या घोषणाबाजीचीच चर्चा अधिक झाली…