Special Report | एसटीच्या विलीनीकरणावर कर्मचारी ठाम, तोडगा कधी?

| Updated on: Nov 22, 2021 | 9:21 PM

आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज 13 वा दिलस आहे. तरीही कुठला निर्णय होत नाही म्हणल्यावर हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतं.

मुंबई : राज्यात 28 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. तर मागील भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसह 13 दिवसांपासून आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात जवळपास अडीच तास बैठक पार पडली. या बैठकीत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यावरुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज 13 वा दिलस आहे. तरीही कुठला निर्णय होत नाही म्हणल्यावर हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतं. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांशी संबंधित हा विषय आहे. असं असतानाही साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले. या बैठकीतही कुठला निर्णय नाही. त्यावरुन हे निर्णयक्षम सरकार नाही, त्यांच्यात एकमत नसल्याचं स्पष्ट होतं, अशी खोचक टीका पडळकर यांनी केलीय.