D.Ad Course : शिक्षक होण्याचं स्वप्न पाहताय?, राज्य सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय

D.Ad Course : शिक्षक होण्याचं स्वप्न पाहताय?, राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

| Updated on: Apr 03, 2023 | 9:24 PM

VIDEO | आता विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं असेल तर आगामी काळात यासाठी चार वर्षांच्या पदवीचं शिक्षण घेणं अनिवार्य, कोणता घेतला महाराष्ट्र सरकारने निर्णय ?

मुंबई : तुम्ही शिक्षक होण्याचं स्वप्न पाहताय? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आता महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला. केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे. आता जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता बारावीनंतर चार वर्षांची बीएड पदवी घेणं अनिवार्य राहणार आहे. विशेष म्हणजे बीएडच्या शिक्षणातही स्पेशलायजेशन असणार आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीस सुरुवात केलीय. त्यानंतरही राज्यात आता नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Published on: Apr 03, 2023 09:24 PM