Chandrapur मधील ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला

Chandrapur मधील ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला

| Updated on: Jun 25, 2021 | 11:54 AM

महाराष्ट्रात वाघांसह इतर प्राण्यांच्या संचारासाठी प्रसिद्ध असणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील बराच काळ बंद असणारे ताडोबा आता खुले करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षभरापासून जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक पर्यटनाची स्थळांवरही पर्यटकांना बंधी करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वाघांसह इतर प्राण्यांच्या संचारासाठी प्रसिद्ध असणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प ही मागील बराच काळ बंद होता. मात्र आता हा प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.