#Tv9podcast | 20 वर्षांपूर्वींचा तालिबान्यांचा कृर चेहरा, राष्ट्रपतींना लटकवलं होतं भर चौकात

#Tv9podcast | 20 वर्षांपूर्वींचा तालिबान्यांचा कृर चेहरा, राष्ट्रपतींना लटकवलं होतं भर चौकात

| Updated on: Aug 17, 2021 | 3:22 PM

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला. तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रपती भवनावरही कब्जा मिळवला आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला. तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रपती भवनावरही कब्जा मिळवला आहे. अशाच प्रकारे तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तानवर कब्जा मिळवत तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्लाह यांची निर्घृण हत्या केली होती.

28 सप्टेंबर 1996 रोजी नजीबुल्लाहला यांची हत्या करुन काबूलच्या एरियाना स्क्वेअरमधील एका खांबाला त्यांचा मृतदेह लटकवण्यात आला होता. खांबाला लटकवण्यापूर्वी त्यांना एका ट्रकच्या पाठी बांधून काबूलच्या रस्त्यावरुन ओढत नेले होते. त्याआधी डोक्यात गोळीही मारण्यात आली होती. त्यांचा भाऊ शाहपूर अहमदझाईचा मृतदेहही त्यांच्या शेजारी लटकवण्यात आला होता. काबूल जिंकल्यानंतर अफगाणिस्तानचा शासक असल्याचा दावा करणाऱ्या तालिबानकडून ही विजयाची आणि हा एक काळ संपल्याची घोषणा होती. नजीबुल्लाह हे शेवटचे राष्ट्रपती होते जे अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत हस्तक्षेपाचे देन होते. नजीबुल्लाह यांना संयुक्त राष्ट्र संघातून बाहेर काढत तालिबान्यांनी त्यांची हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार तालिबानला पाकिस्तान आणि अमेरिकेने उभे केले. जेणेकरून सोवियत संघांना अफगाणिस्तानातून हाकलून लावता येईल.