मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; चिंताही मिटली, तानसा धरण ओव्हर फ्लो
गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली होती. कारण तानसा धरणात पाणीसाठी हा पहिल्यांदाच क्षमतेपेक्षा कमी झाला होता. तर अनेक ठिकाणी पाण्याच्या वाटपात कमाप करण्यात आली होती.
मुंबई | 26 जुलै 2023 : ठाणे जिल्ह्यातील आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणाबाबत महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली होती. कारण तानसा धरणात पाणीसाठी हा पहिल्यांदाच क्षमतेपेक्षा कमी झाला होता. तर अनेक ठिकाणी पाण्याच्या वाटपात कमाप करण्यात आली होती. ते ही जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतही. पण जुलैच्या महिन्यात पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आणि राज्यभरातील नद्यांना पूर आला आहे. याचदरम्यान तानसा धरण परिसरातही सातत्याच्या पावसामुळे धरण भरून ओव्हर फ्लो झाले आहे. ज्यामुळे आता मुंबईकरांच्या चिंतेचे कारणच आता संपले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सध्या तानसा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरण पुर्ण क्षमतेनं भरून वाहू लागले आहे. सध्या धरणातून 1100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होत असून धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.