दानवे याचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात? ठाकरे गटाची खेळी; मनिषा कायंदे यांच्या बाबत काय करणार मागणी?
याचदरम्यान कायंदे यांच्या शिंदे गटात जाण्यानं अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात आलं आहे. विधान परिषदेतील आता सदस्यसंख्या समसमान असल्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीकडून दावा केला जाऊ शकतो.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनिषा कायंदे यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलावर असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता ठाकरे गटाकडून विधान परिषेदत मनिषा कायंदे यांच्यावर कारवाईची मागणी करणार अशी माहिती समोर येत आहे. तर याचदरम्यान कायंदे यांच्या शिंदे गटात जाण्यानं अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात आलं आहे. विधान परिषदेतील आता सदस्यसंख्या समसमान असल्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीकडून दावा केला जाऊ शकतो.
Published on: Jun 20, 2023 01:52 PM