दोघांच्या भांडणात तिसऱ्याला गोळी! अमरावती पुन्हा चर्चेत
हाच वाद सुरु असताना शाळेतून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या (Student) पायाला गोळी लागली. या जखमी विद्यार्थीनीवर सध्या खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु आहेत. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
अमरावती: अमरावती कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कुप्रसिद्ध त्यातच आज जी घटना घडली त्याने अमरावतीमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलाय. अमरावतीमध्ये (Amravati) अमरावतीच्या पठाणचौक चाराबाजार परिसरात दोन तरुणांमध्ये वाद झाला या वादातून गोळीबार झाला. हाच वाद सुरु असताना शाळेतून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या (Student) पायाला गोळी लागली. या जखमी विद्यार्थीनीवर सध्या खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु आहेत. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.
Published on: Aug 12, 2022 07:28 PM
Latest Videos