ते तिघेजण तोडीस तोड आणि जोडीस जोड, रामदास आठवले म्हणतात, 'कधी तरी आमचंही नाव घ्या...'

ते तिघेजण तोडीस तोड आणि जोडीस जोड, रामदास आठवले म्हणतात, ‘कधी तरी आमचंही नाव घ्या…’

| Updated on: Oct 08, 2023 | 7:31 PM

गुजराती पाटी तोडणं योग्य नाही. पण, मराठी पाटी लावा ही मागणी करु शकता. महाराष्ट्रातील पाट्या इंग्रजीत असल्या तरी मराठीतही बोर्ड असावेत. मात्र, पाट्या तोडणं योग्य नाही. सगळे टोल एकदम बंद करता येणार नाही. परंतु, लोकांना परवडेल अशा पद्धतीनं टोल आकारले पाहिजेत.

मुंबई : 8 ऑक्टोबर 2023 | लोकसभेच्या दोन जागा आम्हाला द्याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केलीय. शिर्डी आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या जागा आरपीआयला मिळाव्या. शिर्डीमध्ये मला स्वत:ला उभं राहण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार आहेत. पण. आमच्या पक्षाला यामध्ये पडायचं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, अजितदादा तर गेले अनेक वेळा उपमुख्यमंत्रीच राहिलेत. पण, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. हे तिघेजण तोडीस तोड आणि जोडीस जोड आहेत. मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार करा आणि आमच्या पक्षाला एक मंत्रीपद द्या अशी मागणीही त्यांनी केलीय. कायम तीन पक्षांचं सरकार असंच म्हटलं जातं. कधी तरी सरकारमध्ये आरपीआयं नावंही घेत चला असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Oct 08, 2023 07:31 PM