मुंबईतील लोकसभेच्या ‘या’ 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक?
लोकसभा निवडणुकीसाठी सहा पैकी चार जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गट लढवणार आहेत. कोणत्या जागेवर कोण लढवणार लोकसभेची निवडणूक?
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : ठाकरे गट मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी सहा पैकी चार जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गट लढवणार आहेत. या चार जागांपैकी पहिली जागा ठाकरे गटातील विद्यमान खासदार अरविंद सावंत हे मुंबईतील दक्षिण मुंबई या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवतील. त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबई या जागेवर माजी राज्यसभा खासदार अनिल देशमुख निवडणुकीसाठी उभे राहतील. उत्तर पश्चिम मुंबई येथून ठाकरे गटातील युवासेना उपनेते आणि सरचिटणीस अमोल कीर्तिकर हे लोकसभा निवडणूक लढवतील तर चौथ्या आणि शेवटच्या ईशान्य मुंबई या जागेवर ठाकरे गटाचे माजी खासदार संजय दिना पाटील हे लढणार आहेत.
Published on: Feb 22, 2024 01:29 PM
Latest Videos