‘या’ चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात पुन्हा एकदा धुंवाधार पावसाची शक्यता, मुंबई पुण्याला कोणता अलर्ट?
तर पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. यानंतर आता राज्यात आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुणे, 02 ऑगस्ट 2023 | गेल्या महिन्याभरात राज्यात धुवाधार कोसळधारा बरसल्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. तर पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ही माहिती हवामान विभागाच्या के.एस होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर हा अंदाज वर्तवताना त्यांनी ४-५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस होईल असेही म्हटलं आहे. तर यावेळी पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतर २४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आल्याचे सांगितलं आहे. (Maharashtra News, Latest News)
Published on: Aug 02, 2023 09:35 AM
Latest Videos