नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा; अशी आहे व्यवस्था
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. तर व्हीआयपी सुरक्षा ही पोलीसांची प्राथमिकता असणार असून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक असणार २४ तास तैनात असणार आहे.
नागपूर, ६ डिसेंबर २०२३ : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. ७ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार असून सरकारकडून आवश्यक अशी तयारीही करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ११ हजार पोलिस तैनात करण्यात आल्याचीही माहिती आहे. तर विरोधकही आक्रमक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. तर व्हीआयपी सुरक्षा ही पोलीसांची प्राथमिकता असणार असून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक असणार २४ तास तैनात असणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असणार आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आतापर्यंत ४५ पेक्षा जास्त मोर्च्यांना परवानगी दिली असून अधिवेशन काळात जवळपास १०० मोर्चे धडकणार आहे. या मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हीलंस वॅन तैनात असणार आहे.