तरुणाचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, अभियंत्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

तरुणाचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, अभियंत्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

| Updated on: Nov 23, 2021 | 1:46 PM

लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातील सिंचन भवनासमोर मंगळवारी ही घटना घडली.

औरंगाबादः लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातील सिंचन भवनासमोर मंगळवारी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी वेळीच हस्तक्षेप केल्याने या ठिकाणी सुरु झालेला गोंधळ थांबला.