‘तेव्हा एकनाथ शिंदे वर्षावर येऊन रडले, म्हणाले हे काय…,’ आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊ त्यांची नक्कल काढीत टीका केली. ते म्हणाले की, ' तुम्ही गुगल करुन बघा, आजपर्यंत नगर विकास खातं दुसऱ्या मंत्र्यांना आजपर्यंत कोणी दिलेले नाही. परंतू एकनाथ शिंदे यांना सर्वकाही विश्वासाने दिले. उद्धव ठाकरे यांना जेव्हा लोक सांगायचे की हे मिंधे तुमच्या पाटी काही तरी करीत आहेत. लक्ष ठेवा, त्यावेळी उद्धव साहेब उलट त्याच्यावर चिडायचे. म्हणायचे ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला आहे.त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवीन, हे महाराष्ट्राचे दुर्देव्य आहे जवळच्या व्यक्तीनीच...
ठाणे | 18 फेब्रुवारी 2024 : ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्यावर तोफ डागली. एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची नक्कल काढीत आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण ठोकले. उल्हासनगरातील धीरज ठाकूर या तरुण नगरसेवकाने कल्याणमध्ये खासदारकी साठी खूप मेहनत घेतली होती. मी त्यांना सांगितलं की, एक संधी आपण धीरजला दिली पाहिजे. त्यानंतर शिंदे यांनी जे रडणं सुरु केलं, ‘नाही साहेब. तुमचा विश्वास नाही. मी राजीनामा देतो. मी म्हटलं, जाऊ दे. तुमचे तुम्हाला लखलाभ… एवढंच काय, कल्याणमध्ये त्यांनी केलं होतं ना, ‘मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही आणि म्हणून…मी.., ‘ बापरे हा काय प्रकार आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले. 20 मे 2022 या दिवशीसुद्धा वर्षा बंगल्यावर येऊन उद्धव ठाकरेंसमोर शिंदे असेच रडले होते, मला तुम्ही यापासून वाचवा. भाजप मला जेलमध्ये टाकेल. आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही, असे म्हणाले होते. बरोबर एक महिन्यात ते भाजपात गेले. पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला. आणि आज हे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच ठाण्यातले हल्ली जे मला शिव्या देत असतात. ते आपल्या पक्षात आले होते. त्यांना तिकीट द्यायचं होतं. उद्धव ठाकरेंनी ठरवलं तिकीट देऊयात. पण त्यांनी तेव्हा पुन्हा रडारड सुरु केली’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.