गेल्या १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांचा BMC अधिकाऱ्यांना घेराव
VIDEO | पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिला चिंतेत, कोणत्या भागात पाणीटंचाई?
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं आगमन झालं आहे. मे महिन्यातील प्रचंड कडाक्याच्या उन्हाने हैरान असलेल्या नागरिकांना मान्सूनच्या आगमनाने काहिसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले. पावसाने अनेकांना दिलासा मिळाला असला तरी मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील गोराई परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे. मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील गोराई परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी टंचाई जाणवत आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने चिंतेत असलेल्या महिलांनी आज बोरिवली बीएमसी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला. १ तास या महिलांनी बोरिवली बीएमसीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून ठेवले आहे. जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही बीएमसीमधून बाहेर पडणार नाही, अशी या महिलांची मागणी आहे.
Published on: Jun 16, 2023 06:50 AM
Latest Videos