अमरावतीत भाजपचं तिकीट फिक्स? नवनीत राणा ‘कमळ’ चिन्हावर लढणार? राणा-फडणवीस भेटीत काय ठरलं?
नवनीत राणा अमरावतीतून कमळ चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे. रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर राणांना भाजपचं तिकीट मिळालं तरी अमरावतीतूनच लढणार असं म्हणत अडसूळ बंड करण्याच्या तयारीत
मुंबई, १६ मार्च २०२४ : अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घमासान पाहायला मिळत आहे. नवनीत राणा अमरावतीतून कमळ चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे. रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर राणांना भाजपचं तिकीट मिळालं तरी अमरावतीतूनच लढणार असं म्हणत अडसूळ बंड करण्याच्या तयारीत आहेत. रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यामध्ये नवनीत राणांना भाजपचं तिकीट मिळणार असल्याचं कळतंय. तर नवनीत राणांनी देखील याचे संकेत दिलेत. मात्र नवनीत राणा यांना महायुतीतूनच उघड आव्हान मिळालंय. अमरावतीची जागा शिंदे गटाचीच असून आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ येथून लढणार आणि जर भाजपकडून राणांना उमेदवारी मिळाली तरी स्वतः अपक्ष म्हणून लढणार असा निर्धारच त्यांनी व्यक्त केला. अमरावतीमध्ये नवनीत राणांचे राजकीय विरोधक हे अभिजीत अडसूळच आहेत. २०१९ अभिजीत अडसूळ यांचा दारूण पराभव करून नवनीत राणा या खासदार झाल्यात त्यामुळे यंदा कुणाला तिकीट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.