Cabinet Expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता? शिंदे गटाला मंत्रीपद मिळणार?
अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासह शिंदे-भाजप युतीत सामिल झालेत. त्यानंतर राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झाले. तर राष्ट्रवादीचे ८ आमदारांनी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली.
मुंबई, 26 जुलै 2023 | राज्यातील राजकारण मोठ्या भूकंपानंतर आता राज्याच्या सत्तेतही अनेक बदल झाले आहेत. अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासह शिंदे-भाजप युतीत सामिल झालेत. त्यानंतर राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झाले. तर राष्ट्रवादीचे ८ आमदारांनी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील आणि भाजपमधील अनेक आमदार नाराज झाले. त्यानंतर आता शिंदे गटासह भाजपमधील या नाराज नेत्यांना आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा होती. त्याला आता मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे. या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्याकडून नवी खेळी खेळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्याकडून सध्या शरद पवार गटातील नेत्याचे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जे शरद पवार गटात काही आमदार आहेत. किंवा जे तटस्थ आहेत त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून केले जात आहेत. यादरम्यान शरद पवार गटातील काही आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिली जाण्याची शक्यता आहे. तर महामंडळावर देखील नियुक्त देण्याचे आश्वासन दिले जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र आता या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील नाराज आमदार भरत गोगावले यांच्यासह इतर आमदारांना आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सुचक वक्तव्यानुसार महिला आमदारांना संधी मिळणार का हे पाहावं लागणार आहे.