मुसळधार पावसानं हैराण असलेल्या विदर्भकरांसाठी हवामान खात्याकडून दिलासादायक बातमी
VIDEO | विदर्भात रविवारपासून पावसाचा कोणता असणार अलर्ट? हवामान विभागाचा अंदाज काय?
नागपूर, 28 जुलै 2023 | विदर्भात आज आणि उद्या मुसळाधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला होता. त्यानुसार विदर्भात दमदार पावसाची बॅटिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने हैराण असलेल्या विदर्भकरांसाठी हवामान खात्याकडून एक दिलासादायक बातमी आहे. गेले दोन दिवस मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर आता विदर्भात पाऊस कमी होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भात रविवारपासून पावसाचा कुठलाही अलर्ट नाही. त्यामुळे ३० जुलैपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे. नागपुरात परवा १६४ मीमी पाऊस पडला हा दहा वर्षांतलं दुसरा रेकॅार्ड असल्याची नोंद ही करण्यात आली आहे.
Published on: Jul 28, 2023 04:06 PM
Latest Videos