अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही नाही : Devendra Fadnavis-TV9

| Updated on: Mar 11, 2022 | 7:44 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnaivis)या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

राज्यांचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) आज सादर झाल्यांतर राज्याच्या राजकारणात जोरदार खडाखडी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar)  हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगितले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnaivis)या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा तापलं आहे. कळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. सर्वांच्या तोंडाला काळं फसण्याचे काम या सरकारने केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काही नाही. चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये केल्या, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. तर मला एका गोष्टीचा आनंद आहे. पहिल्या वर्षात आमच्या योजना बंद करणारे सरकार आता पुन्हा त्या योजना सुरू करत आहे. समृद्धी महामार्गपासून मेट्रोपासून बुलेट ट्रेनला विरोध केला आणि आता पुन्ह घोषणा करत आहे.त्यामुळे हसावे की रडावे ते कळेना. असेही ते म्हणाले आहेत. शेतकऱ्यांसाठी दोन वर्षापूर्वीच घोषणा आज पुन्हा केली. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कर्जखाती सांगितली नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. नुकसानाीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. कोरोनात सर्वात जास्त मृत्यू झालेले राज्य का पाट थोपटून घेतंय. असा सवालही त्यांनी केला आहे.

Published on: Mar 11, 2022 06:51 PM