प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीशी फारकत... मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?

प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीशी फारकत… मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?

| Updated on: Mar 28, 2024 | 12:13 PM

प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच वंचितची रणनिती आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवायची.

वंचित आघाडीने अखेर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. इतकंच नाहीतर वंचितने स्वतःचे ८ उमेदवार जाहीर केलेत. त्यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नव्या आघाडीचे संकेत दिलेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच वंचितची रणनिती आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवायची. मात्र मी अद्याप कोणताच पाठिंबा दिला नसल्याचे सांगत ३० मार्चनंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचे म्हटलंय. वंचित राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीतून श्री. प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून लढणार आहेत. बघा स्पेशल रिपोर्ट….

Published on: Mar 28, 2024 12:13 PM