राष्ट्रवादी पक्ष संघटनेत लवकरच भाकरी फिरणार, कोणते होणार बदल?
VIDEO | राष्ट्रवादी पक्ष संघटनेत लवकरच बदल, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष बदलण्यात येणार
मुंबई : राष्ट्रवादी पक्ष संघटनेत लवकरच भाकरी फिरणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्ष संघटनेत जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदावर असणाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. राष्ट्रवादी पक्ष संघटनेत तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर असणाऱ्यांना बदल जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर यासाठी राष्ट्रवादीकडून विभागवार शिबिरं घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये राज्यातील प्रश्नांवर देखील चर्चा करण्यात येणैर आहे. दरम्यान, येत्या १० जून रोजी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा मुद्दा हा केंद्रस्थानी राहिला. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा आणि विधानसभा एकत्रितच लढवायच्या आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.