BJP : विदर्भात ठाकरे गट नावालाही राहणार नाही, बावनकुळेंचे थेट आव्हान..!
भाजपाचे प्रदेशाध्यपदी वर्णी लागल्यानंतर बावनकुळे यांचा विश्वास वाढला असून आता शिवसेना पक्षाला संपवण्याची भाषा भाजपाने सुरु केली आहे. राजेश वानखेडे यांनी तब्बल 5 हजार कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश केला आहे. शिवसेनेची संपूर्ण कार्यकरणी ही वानखेडे यांच्या प्रवेशामुळे बरखास्त झाली आहे.
अमरावती : राजकीय भूकंपानंतर (Shiv Sena Party) शिवसेनेतून शिंदे गटात इनकमिंग सुरु आहे. असे असतानाच अमरावतीमध्ये मात्र, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेश वानखेडे यांनी (BJP Party) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यासह विदर्भात भाजपाचे बळ वाढणार असून विदर्भात ठाकरे गट नावालाही राहणार नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यपदी वर्णी लागल्यानंतर (Chandrashekhar Bawankule) बावनकुळे यांचा विश्वास वाढला असून आता शिवसेना पक्षाला संपवण्याची भाषा भाजपाने सुरु केली आहे. राजेश वानखेडे यांनी तब्बल 5 हजार कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश केला आहे. शिवसेनेची संपूर्ण कार्यकरणी ही वानखेडे यांच्या प्रवेशामुळे बरखास्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या समस्येवर राजेश वानखेडे यांनी आवाज उठवला होता. ज्या शेतकऱ्यांसाठी त्यांची धडपड होती, त्यांना खऱ्या अर्थाने आता न्याय मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
