धार्मिक स्थळांसह लग्नसमारंभातील भोंगे आणि डिजेंवर मर्यादा येणार
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद आता राज्यात उमटायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंनी भोंगे तातडीने बंद करण्याचे सरकारला आदेश दिल्यापासून राज्यातलं वातावरण अत्यंत गरम आहे. नागपूर पोलिसांद्वारे (Nagpur Police) आता भोंग्यांबाबत नवी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद आता राज्यात उमटायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंनी भोंगे तातडीने बंद करण्याचे सरकारला आदेश दिल्यापासून राज्यातलं वातावरण अत्यंत गरम आहे. नागपूर पोलिसांद्वारे (Nagpur Police) आता भोंग्यांबाबत नवी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लग्नसमारंभातील भोंग्यांवरही विघ्न येणार आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांसोबतचं लग्नसमांरभातील भोंगे आणि डिजेवरही यापुढे मर्यादा येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आखून दिलेल्या ध्वनी मर्यादेच्या अमंलबजावणीसाठी नागपूर पोलीस सज्ज झाले आहेत. नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी सर्वच धार्मिक कार्यक्रमांमध्ये भोंगे वाजवायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक केली आहे. विशेष म्हणजे त्याबाबत काल पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि पुजाऱ्यांची बैठक घेतली आहे.