‘वो काले लोग है तो…’, एकनाथ खडसे यांनी कुणाला म्हटले काले लोग?
जळगावमध्ये विरोधकांना धडकी भरली आहे. एकनाथ खडसे या नावाची धास्ती त्यांनी घेतलीय. त्यामुळे कुणीही येतो आणि आमच्यावर आरोप करतो. पण, येथील जनतेला सर्व माहित आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना कुणी भिक घालत नाही.
जळगाव | 21 ऑक्टोंबर 2023 : राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना आलेल्या १३७ कोटींच्या नोटीसवर भाष्य केलं. ‘दाल में कुछ काला है’ अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. त्यावरून एकनाथ खडसे यांनी चांगला टोला लगावलाय. राजकीय दबावापोटी आम्हाला 137 कोटी रुपयांची नोटीस आली. एसआयटीने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आम्हाला आलेली नोटीस ही चुकीची आहे. पण, आमच्याकडेही पर्याय आहे असे खडसे म्हणालेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेलं याबाबतच भाष्य चुकीचं आहे, वो काले लोग है तो उन्हे काला ही दिखेगा, असा टोलाही खडसे यांनी लगावला. गुलाबराव पाटलांचे घोटाळे आम्हालाही बाहेर काढता येतात. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोणते कामे सुरू आहे. त्यात काय सुरू आहे ते आम्हाला माहित आहे. योग्य वेळी ते बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिला.
Published on: Oct 21, 2023 11:39 PM
Latest Videos