Modi 3.0 : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान, ‘या’ तारखेला होऊ शकतो शपथविधी
येत्या ८ जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रपती भवन येथे मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मसाठी ८ जून रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे.
नुकताच १८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात भाजपाप्रणीत एनडीएने २९२ जागांवर विजय मिळवला.भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा २७२ आहे. त्यामुळे एनडीएकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते. तर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होऊ शकतात अशी चर्चा सुरू असताना देशातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. येत्या ८ जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रपती भवन येथे मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मसाठी ८ जून रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन येथे तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, आज दिल्लीत कॅबिनेट मीटिंग देखील झाली. तर दुसरीकडे आज पासून ८जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच हे राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे.