इर्शाळवाडीच्या घटनेना ताजी असतानाच कावनई किल्ल्याचा भाग ढासळला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
तर इर्शाळवाडी नागरिकांच्या पुर्नवसनाचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे पावसाळी अधिवेशात निवेदनातून सांगितलं आहे. इर्शाळवाडी दरड दुर्घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात देखील अशीच दुर्घटना घडली आहे.
नाशिक | 22 जुलै 2023 : रायगडच्या इर्शाळवाडीत मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली असून दरड कोसळून २२ जणांना यात अंत झाला आहे. त्यानंतर आता या घटनेनंतर सर्वजण धास्तावलेले आहेत. तर इर्शाळवाडी नागरिकांच्या पुर्नवसनाचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे पावसाळी अधिवेशात निवेदनातून सांगितलं आहे. इर्शाळवाडी दरड दुर्घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात देखील अशीच दुर्घटना घडली आहे. मात्र सुदैवाने येथे कोणतिही जीवितहानी झालेली नाही. इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा काही भाग शुक्रवारी ढासळला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर ऐतिहासिक शिवकालीन किल्ल्यावरील ही तटबंदी दुपारी 2 वाजेच्या सुमारास दरड कोसळून तुटली. यामुळे येथील आजूबाजूच्या गावांना कुठल्याही प्रकारचा धोका नसून प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. तर किल्ल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणाऱ्या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सुचित करण्यात आलं आहे.