ज्या माणसानं 55 वर्ष संघटनेसाठी खर्च केली त्याच्यावर ही वेळ येणं चुकीचं- संजय शिरसाट

ज्या माणसानं 55 वर्ष संघटनेसाठी खर्च केली त्याच्यावर ही वेळ येणं चुकीचं- संजय शिरसाट

| Updated on: Jul 20, 2022 | 3:45 PM

मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्षनेतृत्वावर नाराज होते. आपली ही नाराजी कदम यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रामार्फत कळवत पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

“रामदास कदम यांची मुलाखत पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं. त्यांनी शिवसेनेत 55 वर्षे काढली आहेत. त्यांच्यासारख्यांवर जो अन्याय झाला, तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. अनेक शिवसैनिकांनी फोन करून आमच्याकडे खंत व्यक्त केली. इतक्या मोठ्या नेत्यांवर पण अशा पद्धतीने अन्याय होतो. रामदास कदम यांना आत्मविश्वास देण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्षनेतृत्वावर नाराज होते. आपली ही नाराजी कदम यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रामार्फत कळवत पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोपदेखील केले.