ही निर्लज्जपणे केलेली लोकशाहीची हत्या, आदित्य ठाकरे यांची अपात्र आमदार प्रकरणात जळजळीत प्रतिक्रीया
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निकाल दिला आहे. या प्रकरणावर शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी जळजळीत प्रतिक्रीया दिली आहे.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला आहे. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. या निकालाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. यावर शिवसेना उद्धव गटाचे युवा नेते यांनी जळजळीत प्रतिक्रीया दिली आहे. या उद्धव ठाकरे यांचे वारसदार असलेल्या आदित्य ठाकरे यांनी हे अपेक्षित होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, जो मूळ राजकीय पक्ष विधानसभा अध्यक्षांनी त्यांना देऊन टाकला ही लोकशाहीची निर्लज्जपणे केलेली हत्या असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.