‘या’ शिवसेना खासदाराला भाजप आमदाराने दिला कपडे फाडण्याचा इशारा, काय म्हणाले पाहा
तुमचाच बॉस नावाचा पोपट आता मरायला आला आहे. म्हणूनच आता ते घरातून बाहेर पडले. अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना घरातून कधी बाहेर पडले नाही. जनतेला भेटले नाहीत. मानेला पट्टा लावून फिरले...
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ येथे त्यांची सभा होती, या सभेत बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठा इशारा दिलाय. तुमचे साहेब इतके दिवस झोपी गेले होते ते आता जागे झाले आहेत आणि दौऱ्यावर निघाले. उखळत्या पाण्याला खळखळाट फार अशी अरविंद सावंत तुमची परिस्थिती झाली आहे. तुम्ही बावनकुळे साहेबांवर बोलत असताना तोंड सांभाळून बोलावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. तुमचा तर खुळखुळा झालेला आहे. तुम्ही म्हणता शिंदे भाजप सरकारचा पोपट मेला आहे. पण, तो तुमचाच बॉस नावाचा पोपट आता मरायला आला आहे. म्हणूनच आता ते घरातून बाहेर पडले. अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना घरातून कधी बाहेर पडले नाही. जनतेला भेटले नाहीत. मानेला पट्टा लावून फिरले आणि आता तुम्ही आम्हाला सांगतात की आम्ही बाहेर पडलो. बावनकुळे साहेब यांच्याबद्दल तुम्ही खुळे म्हणता. बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व आहे. भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे अरविंद सावंत साहेब तुम्हाला परत परत मी साहेब म्हणतोय. पण यापुढे अशी चूक केली तर तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार प्रसाद लाड यांनी दिला.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
