यंदा पेणमधून 26 हजार गणेश मूर्ती परदेशात रवाना

यंदा पेणमधून 26 हजार गणेश मूर्ती परदेशात रवाना

| Updated on: Aug 24, 2024 | 4:11 PM

पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक रंग आणि केमिकलने मुक्त अशा पेणच्या गणेश मूर्ती परदेशात रवाना होत असतात. यंदा पेणमधून 26 हजार दणेश मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.

यंदा गणेशोत्सवाचे आगमन सात सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे अतिशय थोडे दिवस या उत्सवाला राहीले आहेत. गणपती आणि त्याही पारंपारिक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीसाठी पेण खूपच प्रसिद्द आहे. पेण येथील हमरापूरात गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना असून या कार्यशाळेत गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याची लगबग सुरु झालेली आहे. यंदा रायगड येथील पेण येथून पारंपारिक शाडूच्या मातीच्या गणेशमर्तींना खूपच मागणी आहे. पर्यावरणाविषयी जनजागृती वाढल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या समुद्रात सहजासहजी न विरघळणाऱ्या मूर्त्यांची मागणी दिवसेंदिवस घटत चालली आहे. यंदा पेणमधून 26 हजार गणेश मूर्ती परदेशात रवाना झालेल्या आहेत. यंदा सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने गणेशमूर्तीच्या किंमतीत 10 ते 20 टक्के दर वाढ झाली आहे.

 

Published on: Aug 24, 2024 04:09 PM