कराडच्या समर्थात घोषणाबाजी अन् समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण? नेमकं घडलं काय?
खंडणी आणि खुनाच्या आरोपात पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या वाल्मिक कराडसाठी त्याच्या गावातही आंदोलन करण्यात आली. कोण मोबाईल टॉवरवर चढून वाल्मिक कराडला देव म्हणत होतं?
सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीत त्याच्या समर्थकांनी आंदोलन सुरूच ठेवली आहेत. त्याच बरोबर वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर कोर्टाच्या आवारात मोठा ड्रामाही बघायला मिळाला. खंडणी आणि खुनाच्या आरोपात पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या वाल्मिक कराडसाठी त्याच्या गावातही आंदोलन करण्यात आली. कोण मोबाईल टॉवरवर चढून वाल्मिक कराडला देव म्हणत होतं? तर काही महिलांनी कराडच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या ठिय्या आंदोलन करणाऱ्या महिलांच्या अचानक अंगात आलं. आधी फक्त एका महिलेच्या अंगात आल्याचं पाहायला मिळालं. यानंतर काही महिला घोषणा देत होत्या. मात्र आपल्या सोबतीला आलेल्या महिलेच्या अंगात आल्याचं पाहून तिच्याही अंगात आलं. सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वाल्मिक कराडच्या पांगरी गावात महिलांनी अक्षरश: थैमान घातले. या महिला आमच्या आण्णाला न्याय द्या असे म्हणत रस्त्यावरच झोपल्या तर काहींनी ड़ोकंच आपटून घेतलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…